अमरावतीतून अपहरण केलेला नयन अहमदनगरमध्ये सापडला

February 20,2021

अमरावती, 20 फेब्रुवारी : शहरातील शारदानगर येथून अपहरणकरण्यात आलेला नयन लुणीया हा अहमदनगर येथील कोटाला परिसरात सुखरुप सापडला. राजापेठ पोलिसांनी नयनला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ताब्यात घेतले. महिलेसह अन्य दोघे युवक अशा तिघांनाया प्रकरणात अटक करण्यात आली.

राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक मापारी यांच्या नेतृत्वातील पाच जणांचे एक पथक चिमुकल्या नयनच्या शोधासाठी अहमदनगरकडे रवाना झाले होते. पोलिस आयुक्तांसह उपायुक्तांनी आधीचअहमदनगर पोलिसांसोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती. राजापेठ पोलिस नगरमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या नयनसह अपहरणकर्त्यांचा शोध घेतला.त्यात त्यांना चोवीस तासाच्या आतच यश आले. या टोळीत एकूण पाच यजणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. दोघे अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या मार्गावर आहेत.