बाळासाहेब ठाकरे प्राणी उद्यान पर्यटकांसाठी चार दिवस बंद

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक निर्बंध लावले असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान चार दिवस बंद राहणार आहे.
२७ - २८  फेब्रुवारी आणि ६-७ मार्च या चार दिवशी प्राणी संग्रहालय ड्राईव्ह सफारी बायोपार्क पर्यटन सफारी बंद ठेवणार असल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक यांनी एका पत्रकाद्वारे कळविली आहे तसेच १ मार्च व ८ मार्च रोजी सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी उद्यान बंद राहील.