२४ तासात ४४ रुग्णांचा मृत्यू , बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ७१ हजाराच्या वर

September 25,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून २४ तासात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १५०६ कोरोना मुक्त झाले. आज ११२६ बाधित रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ७१,६१६ वर गेली आहे.
दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या शहरात वाढतच चालली असल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे. आज ४४ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात २३ शहरातील, १२ ग्रामीणचे तर ९ इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृतकांची संख्या २२६१ वर पोहोचली आहे. ११२६ बाधित रुग्ण असून ८१७ शहरातील, ३०० ग्रामीण मधील ९ इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. सध्या नागपुरात १५९३७ कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून त्यात २४४५ ग्रामीण मधील तर १३४९२ शहरातील आहेत.