डिलरशिपचे आमिष दाखवून ७ लाखांनी फसवणूक

September 25,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - वन प्लस कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून ७४६००० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर हरडे या युवकाची उमरेड येथे तिरुपती इंटरप्राइजेस नावाची दुकान आहे या दुकानातून मोबाईल, एलईडी टीव्ही ची विक्री करण्यात येते. वन प्लस डिस्ट्रिब्युटरशिप कॉम्प चे व्यवस्थापक व त्यांच्या दोन साथीदारांनी मयूर हरडेला फोन करून सांगितले की, वन प्लस कंपनीला एलसीडी टीव्ही आणि मोबाईलची डिलरशिप तुम्हाला मिळाली आहे आणि ती मिळविण्याकरिता आरोपींनी कागदी करारनामा तयार करून वारंवार बँकेच्या माध्यमातून ७४६५०० रुपये हरडे कडून आरोपींनी घेतले. त्यानंतर डिलिव्हरी ऑर्डरच मिळाला नाही. हरडे ने या कंपनीबाबत चौकशी केली असता ही कंपनी बनावट असल्याचे माहित झाले त्यानंतर हरडेच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.