शहीद जवानांवर शासकीय इतमामात नागपुरात होणार अंत्यसंस्कार

September 25,2020

नागपूर : २४ सप्टेंबर -  जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपुरा येथे 24 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर येथील नरेश उमराव बडोले शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा नागपुरात पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वृत्तानुसार 24 सप्टेंबरला सकाळी अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये नरेश उमराव बडोले हे शहीद झालेत. शहीद नरेश उमराव बडोले हे नागपूर येथील हिंगणा परिसरातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्प जवळील पांडुरंग नगर येथील रहिवासी आहेत. श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव दिल्ली व त्यानंतर नागपूर विमानतळावर रात्री उशिरा पोहोचणार आहे. उदया दिनांक 25 सप्टेंबर शुकवारी सकाळी ८ वाजतानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.