वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी

September 25,2020

चंद्रपूर : २५ सप्टेंबर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात कर्तव्याहून परतत असताना अचानकपणे वाघाने हल्ला केल्याने वनरक्षक एस. एफ. लाटकर गंभीर जखमी झालेत. ही घटना मुधोली परिसरातील आष्टी शिवारात गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

लाटकर यांना तातडीने चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने आणि बरेच रक्त वाहून गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. वरिष्ठ वनाधिकार्यांनी दवाखान्यात पोहोचून त्यांची चौकशी केली. गरज पडल्यास नागपूरला हलवले जाऊ शकते, अशी माहिती मोहरली वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांनी दिली.