मासेमारी करणारा तरुण नदीच्या डोहात बुडाला

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर - मासेमारी करण्यास गेलेला ३५ वर्षीय युवक धोगरा येथील नदी पात्रातील डोहात बुडाल्याची घटना  दुपारी पारशिवनी येथे घडली. 

पेंच नदीला धरणातून पाणी सोडल्या जात असल्याने नदिपात्रात मासेमारी करण्याकरिता पारशिवनी येथील युवक शेषराव शेंडे (वय ३५, रा. पारशिवनी) हा  मासेमारी करीत असताना त्याचा मासेमारीचा गळ हा पाण्यात अडकल्याने तो काढण्याकरिता नदी पात्रातील पाण्यात उतरला असता त्याचा तोल गेल्याने तो नदीपात्रातील पाण्यात वाहुन जाऊ लागला असता त्याला वाचविण्यासाठी मासेमारी करणारा युवक पाण्यात शेषरावला वाचविण्यासाठी गेला असता शेषराव हा पाण्यात पूर्णत: बुडाल्याने शेषराव डोहात बुडत असल्याने तो वाचू शकला नाही. तर या नदी पात्रात पाण्याचे डोह असल्याने शेषराव हा डोहात बुडाल्या तो वर येऊ शकला नाही. 

धोगरा नदी पात्रात मोठ मोठाले डोह असल्याने या भागात मनाई असताना अनेक युवक-युवती येथे चित्रिकरण करण्याकरिता येतात. पाण्यात उतरून मौजमजा करतात. पण, त्यांना या ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नसल्याने येथे जीवितहानी होण्यची दाट शक्यता आहे. मृतक शेषरावचे शव शोधण्यासाठी येथील स्थानिक गोताखोरांनी नदी पात्रातील पाण्यात उतरून शव शोधण्याच्या प्रयत्न केला असता शव सापडले नव्हते.