कारच्या धडकेने बालकाचा मृत्यू

September 25,2020

अमरावती : २५ सप्टेंबर - तळेगाव - आष्टी मार्गावर बुधवारी सायंकाळी बालक रस्ता ओलांडताना आष्टीकडून तळेगावकडे येणार्या कार क्रं. एम. एच. २९ एल ९९४ ने जोरदार धडक दिली. यात संकेत संजय चौधरी वय ४ या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तळेगावचे जुन्या वस्तीत चौधरी कुटुंब राहत असुन मृतकाचे वडीलाचा मागील वर्षीच मृत्यू झाल्याने कुटुंबांच्या पालन पोषणाची जबाबदारी आईवरच आहे. त्यामुळे मृतक बालकाची आई घरासमोरीलच शेतात कामावर गेली होती. बहिणी व भावासोबत बालक आपल्या घरी होता. त्याला शौच आल्याने सदर बालक हा राज्यमहामार्गाच्या रुंदीकरण करण्यात आलेल्या रोडच्या काठाने बांधण्यात आलेल्या घराच्या समोरील नालीवर शौचास गेला होता. शौचावरुन रस्ता ओलांडुन घराकडे येण्यास निघाला असता आष्टी कडुन तळेगाव कडे येणार्याभरघाव कारसमोर तो अचानक आल्याने त्याला कारची जबर धडक बसली. कार चालकाने घटनास्थळावरुन कारसह पळ काढला असता. जखमी अवस्थेतील बालकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दुसर्या वाहनाने आर्वी येथील एका खाजगी दवाखाण्यात नेले असता त्या बालकाला मृत घोषीत केले. तळेगांव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून रात्री उशिरा कारसह चालक पांडुरंग इंगळे याला त्याचे घरुन ताब्यात घेतले आहे. मृतकाच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी मृतदेह तळेगाव पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवून कॅनस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करेपर्यत मृतदेह हटविणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने संतप्त वातावरण होते.