चंद्रपुरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या

September 25,2020

चंद्रपूर : २५ सप्टेंबर - रयतवारी कॉलरी परिसरातील बीएमटी चैकात दिवसाढवळ्या एका युवकाची हत्या केल्याची घटना आज उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव करण केवट असे आहे. चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील बीएमटी चैकात तीन युवकांनी येवून करण केवट याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली.

सुमारे दोन महिन्यापूर्वी याच परिसरात एका घरी सोने चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलिसांना माहिती देतांना राजेश केवट याने सिसीटीव्ही पुâटेज तपासा अशी सूचना पोलिसांना केली होती. तिनही आरोपी सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरी करतांना आढळल्या नंतर त्यांना न्यायालयातून कारागृहात पाठविले गेले. याच प्रकरणात आरोपींनी सुटून आल्यावर राजेश केवट याचा काटा काढण्यासाठी रयतवारी परिसर गाठला.

भांडण उकरून काढत धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न केला. भांडणादरम्यान राजेश केवट याचा भाउ मध्ये पडल्यानंतर आरोपींनी त्याला धारधार शस्त्राचा वापर करत भोसकले. करण केवट रक्ताच्या थारोळ्यात  पडला असतांना आरोपींनी पळ काढला. राजेश केवट याला संपविण्यासाठी आलेल्या आरोपींनी भांडणात मध्ये आलेल्या करण केवट याला संपविले. दरम्यान घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचल्याची तक्रार राजेश केवट यांनी माहिती दिली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.