भरधाव ट्रकच्या धडकेने युवकाचा मृत्यू

September 25,2020

भंडारा : २५ सप्टेंबर - लाखांदूर तालुक्यातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोला येथील रहिवासी ईश्वर वासुदेव

येरने रा.आसोला हा गावचा रस्ता मोटारसायकलने गावाकडे जात असताना खरकाटे राईस मिल जवळ भरधाव ट्रकने चिरडले असता ईश्वरचा जागीच मृत्यू झाला.

ईश्वर हा काही कामाकरिता पत्नीसोबत अर्जुनी/मोर येथे गेला होता. परत येत असताना गावाजवळ रस्ता क्रॉस करत असताना मागवून येणाNया भरधाव ट्रकने ठोकले असता मोटारसायकलवर असलेल्या ईश्वर व त्याची पत्नी खाली कोसळले. ईश्वरच्या डोक्याला जबर मार  लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळाली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ट्रक निघून गेल्याने पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कुळसुंगे,एपीआए गावंडे,मातेरे,कठाने,राहुल गायधने,सोनू गेडाम आधी जण उपस्थित होते.