पार्श्वगायक बालसुब्रमण्यम यांचे निधन

September 25,2020

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर - प्रसिद्ध  पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती.  मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.