आयपीएल मध्येही ड्रग्सचा वापर होत असल्याचा अभिनेत्रीचा दावा

September 25,2020

मुंबई : २५ सप्टेंबर -  अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता याप्रकरणी आरोप असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि मग हळूहळू बॉलिवूडमधीलच ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली, ज्यांचा ड्रग्जची संबंध आहे. त्यानंतर टीव्ही कलाकारांचीही नावं उघड झाली आणि आता या सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीही सुरू आहे. त्याता आता आयपीएलमध्येही ड्रग्जचा वापर होत असल्याचा खळबळजनक दावा एका अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने  आयपीएलमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे दावा केला आहे. कोरोनाकाता नाइट रायडर्स  च्या मॅचनंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी वॉशरूममध्ये कोकिन घ्यायच्या. मला एनसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं, तर मी ही सविस्तर खुलासा करणार असल्याचंही शर्लिन म्हणाली.

शर्लिन म्हणाली, "केकेआरची मॅच पाहण्यासाठी मी कोलकात्याला गेली होती. मॅचनंतर पार्टी ठेवण्यात आली होती. त्या पार्टीतदेखील मी गेले होते. पार्टीत क्रिकेटर्स आणि बॉलिवूडचे बडे कलाकारही होते. मी डान्स करून करून खूप थकले होते. म्हणून फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले. तिथं गेल्यानंतर मी जे पाहिलं ते पाहून हैराण झाले. प्रत्येक जण कोकिन घेत होता"

शर्लिनने आयपीएलच्या कोणत्या सिझनमध्ये हे तिनं पाहिलं हे सांगितलेलं नाही. आयपीएलचे सामने तिसऱ्यांदा भारताबाहेर खेळवले जात आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत आयपीएल झाली होती आणि आता दुसऱ्यांदा यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आलं आहे.