नागपुरात कडक लॉक डाऊन करण्याची महापौरांची मागणी

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर - तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून  आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली.

कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. नागपूरातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 50 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात लॉकडाऊनची गरज असल्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांचीनी नागपुरात लॉकडाऊनची मागणी केली आहे.

नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. सध्या नागपुरात 71 हजार 616 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 53 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2261 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.87 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 74.59 टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट 29.1 दिवस इतका आहे.