चंद्रपुरात सुरु झाला सात दिवसांचा जनता कर्फ्यू

September 25,2020

चंद्रपूर : २५ सप्टेंबर - कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, संसर्गाची साखळी खंडित व्हावी, यासाठी जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरसह जिल्हाभरात शुक्रवार, 25 सप्टेंबरपासून सात दिवसांची जनता संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठही कडकडीत बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.

जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोबतच मृत्यूचा आकडाही वाढला. यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी, महानगरातील व्यापार्यांकची बैठक घेऊन जनता संचारबंदी करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत, स्वयंस्फूर्तीने व्यापार्यां0नी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन गुल्हाने यांनी केले. त्या आवाहनाला नागरिकांनी साथ दिली.

 जनता संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शहरातील सर्व रूग्णालये, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, तसेच औद्योगिक वसाहत परिसरातील सर्व आस्थापना सुरू होत्या. तर किराणा, भाजी, फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने बंद होती. चहा टपर्यात दिसल्या नाही. हातगाड्यांही बंद होत्या. ही संपूर्ण संपूर्ण जिल्हाभरात कायम होती.