अकोल्यात धारदार तालवारींसह दोघांना अटक

September 25,2020

अकोला : २५ सप्टेंबर - अकोला जुने शहरातील सोनटक्के प्लॉट व हिंगणा फाटा आनंदनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापेमारी करून दोन धारदार तलवारींसह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशन व खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

जुने शहरात आरोपी अलीयारखान नबिखान (२६) रा. सोनटक्के प्लॉट हा हातात तलवार घेऊन नागरिकांना धाक दाखवत असताना मिळून त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून २५०० रुपये किमतीची एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच खदान परिसरात आरोपी बच्चनसिंग भारतसिंग बावरी (२६) रा. आनंद नगर हिंगणा फाटा परिसरात हातात तलवार घेऊन नागरिकांना धाक दाखवीत असताना त्याच्याकडून २ हजार रुपये किमतीची एक धारदार तलवार जप्त करण्यात आली. आरोपी विरोधात जुने शहर व खदान पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.