मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आता ठोक मोर्चाचे आयोजन

September 25,2020

उस्मानाबाद : २५ सप्टेंबर - मराठा समाजाच्या वतीने आता ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून, त्याची सुरुवात तुळजापूर येथून करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक यांनी दिली आहे. 

तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात ९ ऑक्टोबरला महाजागर करून ठोक मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यातील समन्वयक यामध्ये सहभागी असणार आहेत. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती उठविण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात येणार आहे. समन्वयकांनी सांगितले, की स्थगिती उठविण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार व राज्य सरकारची आहे. संजय सरकारने सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करून मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण दिले असून, त्याचा लाभ मराठा समाजालाही देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. शासन आदेश काढून मराठा समाजाचा समावेश करण्यासंबंधी कार्यवाही करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. 

राज्य सरकारकडून विविध खात्यांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि मराठा आरक्षणास घ्यावी. त्यापूर्वी सर्व प्रकारच्या नोकरभर्तीला तत्काळ स्थगिती द्यावी. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामधील गुन्हे सरसकट मागे घ्यावे. कोपर्डी प्रकरणातील दोषींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अमंलबजावणी करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे.