२४ तासात नागपुरात २९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

October 14,2020

नागपूर : १४ ऑक्टोबर - राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर उत्तरात चालला असला तरीही मृत्युसंख्या मात्र कायम आहे २४ तासात २९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७४३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर २४ तासात ६०९ रुग्ण बाधित आढळले आहे. 

७४३ रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून कोरोनमुक्तीची संख्या ७८२१४ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३८ टक्के इतके झाले आहे. बाधितांची संख्या ६०९ असून आज पर्यंत ८८४९९ वर बाधित रुग्ण आढळले आहेत. ६०९ रुग्णांमध्ये १९७ ग्रामीण भागातील, ४०३ शहरातील तर ९ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आज ५४२८ चाचण्या झाल्या असून शहरात ४५०१ तर ग्रामीणमध्ये ९२७ चाचण्या झाल्या आहेत. तर ७४१६ रुग्णांवर नागपुरात उपचार सुरु आहेत.