नियमबाह्य फी वसूलीसाठी शाळा व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करणार : बच्चू कडू

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : शाळा व्यवस्थापन आणि पालकांदरम्यान समोरासमोर बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर आलेल्या अहवालावर कारवाई करण्यात येईल. नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क पालकांकडून आकारल्याचे आढळून आल्यास संबंधित दोषी शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा शाळेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शहरातील विविध शाला व्यवस्थापन व पालक यांच्या दरम्यान आयोजित आढावा बैठकत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यावेळी उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले की, एका समिती स्थापन करण्यात आली असून ही समितीअहवाल देईल. समितीचा अहवाल येताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल. यात शिक्षण विभागाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यंदा लॉकडाऊनच्या काळात शालेय वर्ग बंद असतातना ई-शिक्षण वर्ग सुरु आहेत. त्यामुले या वर्षीचे शालेय, शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे, अशी पालकांनी मागणी लावून धरली. शहरातील काही शाळांमध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम शिकविला जातो. याची तपासणी करणार. तसेच अतिरिक्त शुल्क आकारण्याचा कोणत्याही शाळा व्यवस्थापनाला अधिकारी नाही. इतर शुल्काच्या नावाखाली पालकांकडून शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी करता येणार नाही. जबरदस्तीने पुस्तके, कपडे, दफ्तर घेण्यास भाग पाडणार्‍या शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार असून, पालकांनी तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

काही शाला बोगस पालक-शिक्षक समिती स्थापन करत आहेत. असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल,. नर्सरी शाळा परिसरात सुरू करता येत नाही. तसेच पुस्तके विकता येणार नाहीत. तसेच शाळा व्यवस्थापनाने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यास फसवणुकीचे गुन्हे दाखल ककरण्यात येईल, थेट शाळेने वर्ग भरत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण असतानाही संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नसावी, असे असेल तर त्याची यादी बनवावी. शाळा व्यवस्थापनाने चुका केल्या असल्यास त्या स्वीकारव्यात, कार्यवाही करण्याची वेळ आणू नका, असेही त्यांनी शाळा व्यवस्थापनास नसावी, असे असेल तर त्याची यादी बनवावी असेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.