दुकानदाराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

October 17,2020

गोंदिया, 17 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे एका बारा वर्षीय मुलीवर दुकानदार असलेल्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार अक्षय वैद्य याला अटक करून चौकशी सुरु केली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबातील मोठ्या आईचा मृत्यू झाल्याने सारे अन्त्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले होते. आंघोळीसाठी शॅम्पू हवे असलव्याने दुकानात गेली होती. बराच वेळ होऊनही परत न आल्याने आई मुलीला शोधायला दुकानाकडे गेली. आजूबाजूला विचारपूस करीत असताना दुसर्‍या दुकानदाराने आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले. शेजारीच असलेल्या एका दुकानाचे व घराचे दार बंद दिसून आले. परत जात असताना दुकानदाराच्या घराचे दार उघडले असता मुलगी दिसली. आईने मुलीला विचारले असता मुलीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिल्यानंतर तिरोडा पोलिसांत तक्रार दाखलर करण्यात आली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.