लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा हवा

October 17,2020

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : लव्ह जिहाद सारखे प्रकार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कठोर कायदा तयार करावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. अलीकडे लव्ह जिहादची प्रकरणे वाढली आहेत, असा दावा विहिंपचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी केला.

देशातील गैरमुस्लिम समुदाय आज भयभीत आहे. यात गुंतलेल्या घटकांनी समाजाच्या संतपाची भीती बाळगणे आवश्यक असून, त्यांनी हा घृणास्पद प्रकार तातडीने थांबवणे आवश्यक असलव्याचे त्यांनी जारी केलेेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी कित्येक राज्यांच्या मुख्यमत्र्यिांनी काळजी व्यक्त केली आहे. लव्ह जिहाद हा कट किती व्यापक आहे आणि किती तीव्र आहे. त्याची जाणीव या मुख्यमंत्र्यांना झाली आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा. अशा समाजाने जागरूक राहावे आणि ते रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्या, असे आवाहनही विहिंपने या निवेदनात केले आहे. एका अनुमानानुसार दरवर्षी 20 हजारापेक्षा जास्त गैरमुस्लिम मुली लव्ह जिहादाला बळी पडल्या आहेत. असा दावा विहिंपने केला आहे. हिंदू-मुस्लिम विवाहाबात तनिष्कच्या वादग्रस्त जाहिरातीच्या पृष्ठभूमीवर विश्‍व हिंदू परिषदेने हे निवेदन जारी केले आहे.

मागील वर्षी देशात उघड झालेली लव्ह जिहादची 170 प्रकरणे घडली असून, त्याची यादी विहिंपने जारी केली. लखनौमधील लव्ह जिहादला बळी पडेल्या एका पीडितेने आत्महत्या केली किंवा सोनभद्र येथे शिरच्छेद केलेल्या अवस्थेत एका लव्ह जिहाद पीडितेचा मृतदेह आढळला. मागील 8 ते 10 दिवसांत अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. एखाद्या कठोर व्यक्तीचीही हृदय व्याकूळ होईल. अशी ही प्रकरणे असल्याचे जैेन यांनी म्हटले आहे.