डीआरडीओने केली ब्राम्होस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

October 19,2020

चेन्नई : १९ ऑक्टोबर - ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची  यशस्वी चाचणी घेण्यात आली. नौदलाच्या स्वदेशी लढाऊ विनाशिका आयएनएस चेन्नईवरून अरबी समुद्रात लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आले होते. या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य टिपल्याने चाचणी यशस्वी ठरली. याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, ब्रह्मोस आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.

लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावात भारत आपली शक्ती बळकट करण्यात गुंतला आहे. या दृष्टीने रविवारी रविवारी देशाला मोठे यश मिळाले आहे. ब्रह्मोस प्राइम स्ट्राइक शस्त्राद्वारे भारतील नौदलाला पृष्ठभागावरील लांब पल्ल्याची लक्ष्य टिपता येणार आहे. यामुळे युद्धनौकाची कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास अधिक सक्षम असेल.

यापूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने ओडिशाच्या चांदीपूर येथे ३0 सप्टेंबरला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. ब्रह्मोस हे पहिले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे सध्या सेवेत आहे. २00५ मध्ये भारतीय नौदलाने आयएनएस राजपूतवर हे क्षेपणास्त्र तैनात केले होते.

भारतीय लष्कराने आपल्या तीन रेजिमेंटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रचा समावेश केला आहे. म्हणजेच शत्रूने कुठलेही पाऊल उचलले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हाती नवीन शक्ती आल्याने शत्रूला झटका बसणार आहे. स्वदेशी-विदेशी शस्त्रांद्वारे सैन्याला अधिक बळकट करण्याचा भारताचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.