कमलनाथ यांची भाजप महिला उमेद्वारांवरील टीका ठरली वादग्रस्त

October 19,2020

भोपाळ : १९ ऑक्टोबर -  बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू आहे. मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथने भाजपाच्या महिला उमेदवाराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यानी केलेल्या विधानावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले की, सुरेंद्र राजेश आपले उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्या सारखे नाही? काय तिचे नाव? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवे होते, ही काय आयटम आहे. इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहे. ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर सर्मथक मानले जाते.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कमलनाथ जी! इमरतीदेवी त्या गरीब शेतकर्याच्या मुलीचे नाव आहे, ज्यांनी गावात मजुरी करण्यापासून सुरूवात केली. आज लोकप्रतिनिधीच्या रुपात राष्ट्र निर्माणात मदत करत आहे. काँग्रेसने मला भूखा-नंगा म्हटले आणि एक महिलेसाठी आयटम सारख्या शब्दाचा वापर करून आपली विचारसरणी दर्शवली.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये शिवराज सिंह म्हणतात, स्वत:ला र्मयादा पुरुषोत्तम म्हणवणारे अशा अर्मयादित भाषेचा वापर करत आहेत? नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात देशातील महिला उपवास करत आहेत. अशावेळी तुमच्या वक्तव्यातून तुमची आखूड बुद्धीचे प्रदर्शन होते. तुम्ही तुमचे शब्द मागे घेतले. इमरतीदेवीसह राज्यातील प्रत्येक मुलीची माफी मागितली तर अधिक चांगले होईल.