तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर -  मित्रांसोबत गोरेवाडा तलावात  पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. जयराज योगीराज निहारे (वय २२) असे त्याचे नाव असून, तो चांगला स्विमर तसेच ट्रेनर होता, अशी माहिती मिळाली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. त्याला शोधून काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवान रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. जयराज आणि त्याचे दोन मित्र नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी गोरेवाडा तलावावर पोहायला गेले. जयराज आणि एक मित्र पोहायला लागले. तर, दुसरा एक तरुण काठावर बसला. काही वेळेनंतर आतमध्ये गेलेला जयराज पाण्यावर आला नसल्याने सोबत पोहणार्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, तो दिसला नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. गिट्टीखदान पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.