पायाला जिवंत विजेची तर गुंडाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

October 19,2020

यवतमाळ : १९ ऑक्टोबर -  तीन वर्षांपासून  पत्नीला झालेला पक्षघाताचा आजार आणि यंदा परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेले कपाशीचे पीक अशा दृष्टचक्रात   सापडलेल्या उटी येथील वैफल्यग‘स्त शेतकर्याने शेतातच पायाला जिवंत विद्युत तार गुंडाळून आत्महत्या केली. उटी येथे रविवार, 18 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या थरारक घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पंजाब माधव गावंडे (वय 60) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. या अल्पभूधारक शेतकर्याकडे केवळ एक हेक्टर शेती आहे. शेतातील तोकड्या उत्पन्नामुळे ते सातत्याने गरीबीशी दोन हात करीत होते. त्यात मागील तीन वर्षार्ंपासून त्यांच्या पत्नीला पक्षाघाताचा आजार झाल्याने ते प्रचंड विवंचनेत होते. यंदा परतीच्या पावसाने शेतातील कपाशी नेस्तनाबूत केली.

 या संकटाच्या मालिकेमुळे या वैफल्यग‘स्त शेतकर्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी 6 वाजता शेतात जाऊन त्यांनी विजेची तार पायाला गुंडाळली आणि मोटरपंपाच्या फ्युजमध्ये टाकून स्वतःला करंट लावून आत्महत्या केली. थोड्या वेळाने ही घटना उघडकीस आली. या शेतकर्याकडे सोसायटीचे आणि खाजगी कर्ज आहे.

जिवंत विद्युत तारेचा करंट लावून पंजाब गावंडे यांनी आत्महत्या केल्याची वार्ता गावात पोहचताच शेत शिवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली. या घटनेची तक‘ार पोलिसांकडे देण्यात आली. मृत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि मोठा परिवार आहे.