कार अनियंत्रित होऊन दोन सैनिक जखमी

October 19,2020

वर्धा : १९ ऑक्टोबर - समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग सात वरील उब्दा शिवारात खड्ड्यामुळे कार अनियंत्रित होऊन कार पलटून सिकंदराबाद येथील दोन सैनिक जखमी झाले. ही घटना 18 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उब्दा शिवारात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद येथील सि. आर. पि. एफ बटालियचे रामरतन प्रसाद सिंग (49), राजेश कुमार (39)दोन्ही रा. सिकंदराबाद हे हैदराबाद कडून नागपूरकडे बिहार येथील निवडणुकीच्या कामाकरिता बि. आर. 01 पि. एल 2680 कारने जात असताना उब्दा शिवारात त्यांच्या कार समोर आलेल्या खड्डयाने अनियंत्रित होऊ पलटी होऊन रस्त्याच्या दुसर्या कडेला येऊन पलटी झाली. या अपघात रामरतन सिंग, राजेश कुमार हे दोघेही जखमी झाले.

 या अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकशीला मिळताच साहय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, ज्योती राऊत, प्रदीप डोंगरे, गौरव खर्डे, राजेंद्र बेले यांनी घटनास्थळ गाठुन दोन्ही जखमींना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी जाम महामार्ग पोलिसांनी रसत्यावर उलटलेली कार रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली.