तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षावरच केला चाकूहल्ला, दोन जखमी

October 19,2020

चंद्रपूर : १९ ऑक्टोबर - घुग्घूस येथून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हातारदेवी या ग्रामीण भागात घरासमोर तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांचा मित्र चर्चा करीत असताना जुन्या वैमनस्यातून  गावातील एका इसमाने तंटामुक्ती अध्यक्षांवर चाकू हल्ला करीत त्यांना जखमी केले. यात त्यांचा मित्रही जखमी झाले. ही घटना काल  रात्री ९.३0 वाजतादरम्यान उघडकीस आली. सुरेंद्र झाडे व अविनाश भोंगळे असे जखमींचे नावे आहेत. तर विनोद राजूरकर (४५ ) रा. म्हातारदेवी असे आरोपीचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, हे बोलत असताना आरोपी विनोद राजूरकर (45) रा.म्हातारदेवी याने पूर्ववैमण्यष्यातून सुरेंद्र झाडें यांच्या गळ्यावर चाकूने वार केला असता अविनाश भोंगळे हा वाचविण्यासाठी गेला असता त्याच्या बरगडीवर वार करून जखमी केले जखमी अस्वस्थेत दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याची तक्रार घुग्घुस पोलीस स्टेशन येथे दिली असता पोलिसांनी कलम 307 खाली गुन्हा दाखल करून आरोपी विनोद राजूरकर याला अटक करण्यात आली पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. नि. वीरसेन चहांदे करीत आहे.