कत्तलीसाठी नेण्यात येणारी १७ जनावरे पोलिसांनी सोडवली

October 19,2020

भंडारा : १९ ऑक्टोबर - क्रुरतेची वागणूक देत जनावरांना कत्तलीसाठी वाहून नेणार्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई साकोली येथील अग्रवाल पेट्रोपंपजवळ करण्यात आली. आरोपी कैलास श्यामराव चुटे (३८), नरेश यशवंत पुसाम (४२), राजू मारोती कुंभरे (४0), मियाज कुरेशी (४0) सर्व रा. गोंदिया व विठ्ठल झोडे (३५) रा. बरडकिन्ही हे १७ जनावरांना बांधून क्रुरतेची वागणूक देत मारहाण करून कत्तलीसाठी वाहून नेताना आढळून आले. साकोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार पाटील करीत आहेत. सदर जनावरे सुकृत गौशाला खैरी पिंपळगाव येथे दाखल करण्यात आली आहेत.