गडचिरोलीत महिलांनी धाड घालून केला विदेशी दारूचा साठा जप्त

October 19,2020

गडचिरोली : १९ ऑक्टोबर - शहर मुख्यालयापासुन २0 किमी अंतरावर असलेल्या बामणी या गावात अवैध रित्या दारू विक्री होत असल्याच्या माहितीवरून गावसंघटनेच्या महिलांनी गावात विविध ठिकाणी धाड टाकून विदेशी दारूच्या साडेचार पेट्या नष्ट जप्त केल्या. 

बामगणी गावात दारूबंदी असतानाही नव्याने गावातील काही व्यक्ती गावात विदेशी व गावठी दारू विकत असल्याची माहिती १८ ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील दारुबंदी संघटनेच्या महिलांनी मिळाली. त्यांनी मुक्तीपथ संघटनेला दिली असता त्यांनी लगेच बामणी गावाला जाऊन भेट देऊन तेथील स्थानिक गाव दारुबंदी संघटना व गाव युवा मंडळ यांना एकत्र करून सभा घेऊन दारू विक्री करणार्या बदल सविस्तर माहिती घेतली व त्यांना सबोत घेऊन गावातील दारू विक्री करणार्या भिमया कोटा याच्या घरावर धाड टाकली असता त्याच्या घरातून इंग्लीश दारूच्या साडेचार पेटया सापडला त्यात ३६ बाटल्या किंगफिशर बियर तर लहान ४0 बाटल्या रॉयलब्लु व मोठय़ा ६ बाटल्या सापडल्या. तसेच मलक्का मोंडी हिच्या घरी ४ लिटरच्या गावठी दारूच्या २ बाटल्या सापडल्या, बापु कुमरी याच्या घरी १ लिटर गुडुंबा बाटली तसेच भिमय्या कोटा याच्या घरातुन एक ड्रम ६000 लिटर चार मोह साडवा जप्त करण्यात आला. हा सर्व दारू साठा संघटनेच्या माध्यमातून नष्ठ करून दारु विक्री करणार्या व्यक्तींना यापुढे गावात दारु विक्री करण्याची ताकीद दिली.