भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट डिझायरच्या धडकेत दुचाकीस्वारांसह दोघांचा मृत्यू

October 19,2020

अमरावती : १९ ऑक्टोबर - भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना खोलापूर येथील वीज वितरण कार्यालयासमोर घडली. 

पोलीस सूत्रांनुसार, शिंगणापूर येथील रवी श्रीमंत इंगळे व बापूराव इंगळे हे दोघे त्यांच्या दुचाकीने खोलापूर येथून शिंगणापूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच २९/ एआर ७६०६ च्या चालकाने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही काही नागरिकांनी उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणले असता तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार चालक घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला. याप्रकरणाचा पुढील तपास खोलापूर खोलापूर पोलीस करत आहेत. आठवडाभरात अमरावती-दर्यापूर महामार्गावर तब्बल ४ भीषण अपघात घडले आहेत.