पोलीस ठाण्यातूनच जप्त ट्रक चोरीस गेला

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्यातूनच एक ट्रक चोरीस गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटेनमुळे चोरट्याने उघडपणे पोलिसांना आव्हानच दिलं आहे.  पोलिसांनी जप्त केलेला ट्रक पोलीस स्थानकातून घेऊन चोरट्याने पोबारा केला आहे.

एके स्टील कंपनीचा सळ्यांनी भरलेला ट्रक ९ ऑक्टोबर रोजी चोरी झाला होता. यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट – ३ च्या पथकाने संजय ढोने नावाच्या आरोपीस ट्रक व मालासह अटक केली होती व लकडगंड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले होते.

यावर लकडगंज पोलिसांनी पुढील कारवाई करत, चोरास न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर आरोपीस जामिन मंजूर झाला होता. यानंतर आरोपीने पोलिसाच आव्हान देत लकडगंज पोलीस स्थानकासमोर उभा असलेला ट्रक पळवून नेला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.