गोंदिया जिल्ह्यात एक गांजा तस्कर अटकेत, अडीच किलो गांजा हस्तगत

October 19,2020

गोंदिया : १९ ऑक्टोबर - देवरी पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत एका गांजा तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून २ किलो ५४० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. हिरालाल तुकाराम मेश्राम रा. कोयलारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तालुक्यातील कोयलारी येथे गांजा साठवणूक विक्री होत असल्याची माहिती देवरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, देवरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कदम यांच्या पथकाने आरोपी हिरालाल मेश्राम याच्या घरी धाड टाकून घर व परिसराची झडती घेतली असता घराशेजारी शेतात आंब्याच्या झाडाजवळ बांधलेली प्लास्टिकची पिशवी पंचांसमक्ष उघडली. पिशवित गांजा आढळला. या गांजाचे वजन २ किलो ५४० ग्रॅम, किमत २० हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी हिरालाल मेश्राम याला अटक करुन त्याच्यावर देवरी पोलिस ठाण्यात डड्ढग्स अॅचक्ट १८८५ च्या कलम २० (२) (बी) २१ (बी) २२ (बी) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कदम करीत आहेत.