उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे

October 19,2020

वाशीम : १९ ऑक्टोबर - वाशीम ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. वाशीम पासून 16 किमी अंतर असलेल्या सायखेडा या गावाजवळ उड्डाणपुलाचे का सुरू आहे. हा उड्डाणपुलाचा स्लॅब काल सायंकाळच्या दरम्यान कोसळल्याची घटना सोमवारी, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली. तयार होण्याआधीच निर्माणाधिन पूल कोसळल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह लागले आहेत.

अकोला - नांदेड तर पुर्वीच्या इंदौर - हैद्राबाद या राज्य महामार्गाचे चौपदरी काँक्रीटीकरणाचे काम नांदेड रस्ते विभागाच्या देखरेखखाली करोडो रुपये खर्च करुन सुरु आहे. हे काम गुजरातमधील मोन्टो कारले या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने काही रस्त्याच्या भागाचे काम जयंती पटेल या ठेकेदाराला तोडून दिले. वाशीम पासुन 16 कमी अंतराावर सायखेडा या गावाला महामार्गाखालून जाण्यासाठी उड्डाणपुल निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काम सुरु असतांनाच हा उड्डाणपुल सेंट्रीगसह कोसळला. आजुबाजुला कंपनीचे कर्मचारी राहतात. त्यातच पाऊस सुरू होता. पाण्यापासून बचावासाठी कर्मचारी बाजुला गेले असल्यामुळे जीवितहानी टळली.

 पूल कोसळल्याची माहिती मिळताच जेसीबी व पोकलॅन्ड च्या मदतीने साहीत्य उचलून कर्मचार्यांनी काही घडले नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावरुन महामार्गाच्या कामात किती भ्रष्टाचार होत आहे हे सिध्द होते. निर्माणाधिन काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हा पुल किती दिवस टिकणार याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहेत.