पंतप्रधानांनी दिलेला आधार मी कधीही विसरणार नाही - चिराग पासवान

October 19,2020

पाटणा : १९ ऑक्टोबर - मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या संबंधाविषयी कुणालाही सांगण्याची गरज नाही. माझे वडील रुग्णालयात दाखल असल्यापासून तर त्यांच्या अंत्यसंस्कारापर्यंत पंतप्रधानांनी दिलेला आधार मी कधीही विसरू शकणार नाही. असे लोक जनतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंग धरत असतानाच चिराग पासवान यांनी विद्यमान मुख्यमंत्री आणि नितीश कुमार यांना जातीवादी असल्याचे संबोधत भाजप आणि आपल्यात दुरावा निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. माझ्यामुळे पंतप्रधानांसमोर कुठलेही धर्मसंकट उभे राहावे, अशी माझी इच्छा नाही. नितीश कुमार यांना संतुष्ट करण्यासाठी ते मला काहीही बोलू शकतात, असे चिरागने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बहुमत मिळाल्यास विद्यमान मुख्यमंत्री हेच महायुतीकडून पुन्हा मुख्यमंत्री बनणार असल्याचे भाजप नेतृत्वाने जाहीर केले होते. त्यावरून पुन्हा शाब्दिक वाद रंगला आहे. त्यावर चिराग पासवान यांनी नितीश कुमार कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनणार नाहीत. आपण भाजपविरोधी उमेदवार दाखल करत नसून, भाजप-लोजपा  युतीच सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

आपणास भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाबद्दल कुठलीही तक्रार नसून बिहारमधील भाजप नेता केवळ नितीश कुमार यांनी प्रोत्साहन दिल्यानेच लोजपाबद्दल चुकीचे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांचे विचार युवावर्गविरोधी असून, भ्रष्टाचाराला संरक्षण देणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी राजवटींकडून होणारी कृत्ये आता यांच्याकडून होत आहेत. बिहारमध्ये कोणतेही नवीन उदयॊगधंदे आले नसून, मागील १० वर्षात इथे कुठलाच विकास झालेला नाही. जर राज्यात लोजपा समर्थित सरकार आले तर विद्यमान सरकारच्या कामांची चौकशी केली जाईल. असेही चिराग पासवान यांनी सांगितले.