कृषी सहसंचालकांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

October 19,2020

अकोला : १९ ऑक्टोबर - अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी वाई  येथील पनवेली संशोधन केंद्र आणि पानवेली, पानपिंपरी , सफेद मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संवाद साधला. 

यावेळी त्यांनी या पिकातील येणाऱ्या समस्या शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या. वनऔषधी पिकांची लागवड ही  फार कमी प्रमाणात होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पानपिंपरी तसेच सफेद मुसळी पिकाची लागवड केली पाहिजे. या पिकाची होणारी घट ही चिंतेची बाब आहे. या पिकाला पीक विमा संरक्षण देण्यात यावे आणि विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत सफेद मुसळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या विभागीय कृषी सहसंचालकांनी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नलावडे, उपविभागीय कृषी अधिकारी अकोला कांताप्रसाद खोत, उपविभागीय कृषी अधिकारी अकोट वाघमारे, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी भारसाखळे, कृषी सहायक ईश्वर बैरागी यांच्यसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.