नागपुरात कोरोना बाधितांची संख्या रोडावली

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - नागपूर शहरात कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना दिसत आहे. चाचण्या कमी झाल्या म्हणून रुग्णसंख्या कमी  येत असल्याची ओरड नागरिकांत आणि प्रशासनात होती मात्र, चाचण्यांची आज ६८१३ चाचण्या करण्यात आल्या त्यात एकूण ४५७ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आज ४९७ रुग्ण कोरोना मुक्त आले आहेत. मृतकांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

४९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आजपर्यंत ८१८५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर बरे होण्याचे प्रमाण ८९.८२ टक्के इतके झाले आहे. तर बाधित रुग्णांची संख्या ४५७ असून आजपर्यंत ९११३२ झाली आहे. २४ तासात १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात १० शहरातील, ४ रुग्ण ग्रामीण भागातील तर ५ इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत २९६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ६८१३ चाचण्या झाल्या असून त्यात शहरात ४८४४ तर ग्रामीणमध्ये १९६९ चाचण्या घेण्यात आल्या. सध्या शहरात ६३१० बाधित रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत  आहेत.