डॉ. चौधरी दाम्पत्याच्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पाने मिळवली जगभरात प्रसिद्धी

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - हीटको (हेल्थ एज्युकेशन अँड टेलीकन्सल्टेशन ऑन ऑस्टिओपोरोसिस) हा डॉक्टर संजीव व डॉक्टर वैशाली चौधरी यांच्याद्वारे राबवण्यात येणाèया अकल्पित प्रकल्पाने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे.

 ऑस्टिओपोरोसिस अत्यंत दुर्धर आजार आहे. सामान्यपणे मासिक पाळी बंद झाल्यामुळे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणाèया या आजारात हाडांचे कॅल्शियम कमी होऊन हाडें वेगाने ठिसूळ होतात व कुठल्याही अपघाता विना, मार लागल्या विना शरीराचे महत्त्वाची हाडे तुटून पडतात. ही तुटलेली हाडे सहसा जुळत नाही व जुळल्यास कायमस्वरूपी व्यंग राहते. दरवर्षी १० दशलक्ष रुग्णांची नोंद करणारा भारत या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये अग्रगण्य आहे. पाठीच्या कण्याचे हाड, जांघेचे हाड व हाताच्या हाडाचे जास्त नुकसान करणाèया या आजाराचे प्रमाण जनजागृतीचा अभावामुळे ग्रामीण भागात जास्त आढळतो.

 संगणक व व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन या आजाराशी लढा देण्यास सक्षम करणारा हा प्रकल्प आतापर्यंत ५१ गावांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला.

 हा प्रकल्प राबविताना येणाèया अडचणी लक्षात घेऊन डॉक्टर चौधरी यांनी पुढील कार्या करिता आधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज अशा व्हॅन ची निर्मिती केली आहे. सुझुकी बनावटीच्या गाडीमध्ये आवश्यक बदल करून अध्यावत बनावटीच्या गाडीची डॉक्टर चौधरी यांनी निर्मिती केली आहे. या गाडीच्या बाह्यभागात ऑस्टिओपोरोसिस आजाराची सखोल माहिती देणारे. पद्य ,गद्य, घोषवाक्य यांच्या फलकांनी सुशोभित केला आहे. गाडी निर्धारित गावात पोचताच गाडीच्या छतातून निघणाèया यंत्रणेतून वाजणारे ऑस्टिओपोरोसिस आजारावर रचलेले लोकगीत गावातील लोकांना आकर्षित करते.

 वातानुकूलित प्रदर्शन दालना सारखा गाडीच्या आतील भाग अतिशय मोहक आहे. छायाचित्रे गद्य-पद्य असलेली डिजिटल फलक अत्यंत सोप्या भाषेत ऑस्टिओपोरोसिस ची माहिती देतात. मल्टी सिम राउटरने जोडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या दालनातून रुग्ण, डॉक्टर चौधरी यांच्याशी थेट संवाद करू शकतात. हे दालन या गाडीचा विशेष तांत्रिक आकर्षण आहे. डॉक्टर चौधरी यांची अद्वितीय हीटको व्हॅन उत्कृष्ट कलाकृतीचे उदाहरण आहे.

 ही गाडी भारताच्या कानाकोपèयात स्वास्थ विषयक जनजागृती चा पायंडा घालेल असा विश्वास अमेरिकेतील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान शास्त्रज्ञ व भारतातील संगणक क्रांतीचे जनक सॅम पित्रोंडा यांनी व्यक्त केला. हीटको व्हॅन उत्कृष्ट संशोधनाचा नमुना असून जगात ऑस्टियोपोरोसिस चा बिमोड झाल्यास त्यात या प्रकल्पाची महत्त्वाची भागीदारी राहील असे व्यक्तव्य दुबईच्या ब्रिटिश विद्यापीठाचे कुलपती शेख महंमद बिन अल मगदूम यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटलं आहे.