अवैध देशी कट्ट्याची वाहतूक करताना दोन अटकेत

October 20,2020

वर्धा : २० ऑक्टोबर - अवैध रित्या देशी कट्ट्यांची वाहतूक करताना स्थानिक वाल्मीकनगर येथील गणेश एतबान (43), अविनाश खोडे (30) यांना अटक केली. ही कारवाई पुलगाव पोलिसांनी राममंदिर परिसरात केली. दोघांकडून 2 देशी कट्टे, 11 जीवंत काडतूस, एक चाकू, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वाल्मीकनगर येथील एतबान व खोडे अमरावती जिल्ह्यातून विटाळामार्गे एम. एच. 40 यू. 9638 क्रमांकाच्या दुचाकीने देशी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाली. त्या आधारावर स्थानिक राममंदिर परिसरात नाकाबंदी करुन विटाळामार्गे येणार्या दुचाकी चालकांची अंगझडती घेतली असता एतबान आणि खोडे यांच्याकडे 2 देशी कट्टे, 11 जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी देशी कट्टे व जीवंत काडतूससह 2 भ्रमणध्वनी, एक चायनीज चाकू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, राजेंद्र हाडके, खुशाल राठोड, बाबुलाल पंधरे, संजय पटले, पंकज टोकोणे, स्वप्नील जिवणे, शरद सानप, जयदीप जाधव, मुकेश वंादिले, प्रदीप सहाकाटे यांनी केली.