६ तरुणांनी केला २ अल्पवयीन बहिणींवर बलात्कार

October 20,2020

जालोर : २० ऑक्टोबर - राजस्थानमध्ये बलात्कार व सामूहिक बलात्कारासह अन्य गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. आता येथील जालोरच्या भीनमाल ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी सहा तरूणांनी एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना सुमसाम असलेल्या टेकडीवर नेले व तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी या मुलींना जसवंतपुरा ठाणे क्षेत्रातील राजपुरा येथील सुंधामाता टेकडीवर बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.

स्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या व वेदनने विव्हळत असलेल्या त्या दोघींसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना एका रिक्षात झोपवून रुग्णालयात नेण्यात आले. या दोघींपैकी एकीची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे माहिती समोर आली आहे. पोलीसांकडून प्राप्त झालेल्य माहितीनुसार या प्रकरणी एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. तर, अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.