तपास सुरु असताना पोलिसांनी माध्यमांसमोर जाणे चुकीचे - कपिल सिब्बल

October 20,2020

मुंबई : २० ऑक्टोबर - केवळ याच प्रकरणात नव्हे, तर कोणत्याही संवेदनशील प्रकरणात तपास सुरू असतानाच पोलिस प्रसारमाध्यमांसमोर माहिती उघड करतात, हे कितपत योग्य आहे?', असा प्रश्न खंडपीठाने कपिल सिब्बल यांना केला. तेव्हा 'न्यायालयाचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे आणि न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणून मला तो पूर्णपणे मान्य आहे. तपास सुरू असताना पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर जायला नको. परंतु, हे दुष्टचक्र आहे. प्रसारमाध्यमांकडूनही मीडिया ट्रायल होत असते. त्यामुळे हे प्रकार दोन्ही बाजूंनी थांबायला हवेत. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधलेले आहे', असे म्हणणे सिब्बल यांनी मांडले. त्यावर 'प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने त्यांनीही जबाबदारीनेच वागणे अभिप्रेत आहे', असे मत खंडपीठाने व्यक्त केले.