शेतात वीज कोसळून एकाचा मृत्यू , दोन जण जखमी

October 20,2020

यवतमाळ : २० ऑक्टोबर -  जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील आयता  इथं शेतात वीज कोसळल्याने एका तरुण मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

तेजस नागोराव मेश्राम असं मृतकाचे नाव आहे. आयात येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस आला. तेव्हा सोयाबीन काढणारे सर्व मजूर अंगावर ताडपत्री घेऊन एका ठिकाणी उभे होते.

त्याच, दरम्यान तेजसच्या अंगावर वीज कोसळली त्यात तो जागीच ठार झाला.  तर त्याच्या शेजारीच उभे असलेले कृष्ण मेश्राम, मनोज मेश्राम हे  दोघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.