अमरावती जिल्ह्यात जप्त केला १५ लाखाचा अवैध गुटखा, ६ अटकेत

October 20,2020

अमरावती : २० ऑक्टोबर - अमरावती जिल्ह्यातील अवैध गुटका तस्करीवर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.या करवाई अंतर्गत, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तिन पोलीस स्टेशन हद्दीतून १८ लाख, ५२ हजार, ४२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १५ लाख ३४ हजार, १९२ रुपयाचा गुटका, तर ३ लाख १७ हजार ८५0 रूपयाच्या इतर साहित्याचा समावेश आहे.तसेच या प्रकरणी ९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ जणांना अटक केली आहे.तर ३ आरोपी फरार आहेत. गुटका तस्करांवरील ही धडक कारवाइ जिल्हा ग्रामीण पोलिस विभागाचे, आयपीएस अधिकारी निकेतन कदम यांनी केली आहे. दिनांक १७ ऑक्टोबर २0२0 ला रात्रीच्या गस्त वर असताना मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे, मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतून रामजीबाबा नगर येथील १)अंकुश अनिल पकडे वय २८ वर्ष वीरभक्त चौक,२)मो शपी मो रशीद वय ३३ वर्ष,रा.माळीपूरा मोर्शी,३)सलीम शहा गफूर शहा रा.रामजीबाबा प्लॅट मोर्शी यांच्यावर रेड केली. त्याच्या ताब्यातून शासन बंदी असलेल्या गुटखा,सुगंधित पान मसाला एकूण ३,१७,८५0 रुपयाचा माल तसेच वाहतूक साठी वापरण्यात आलेले वाहन क्रमांक एम एच २७ बीएक्स ४११२ महिंद्रा पिकअप अंदाजित किंमत ३५0,000 चा मुद्देमाल जप्त करणयात आला.तसेच आरोपीला ताब्यात घेऊन मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याच दिवसी दुसर्या कारवाईत सकाळी १0 च्या दरम्यान शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील, करजगाव या ठिकाणी शिरजगाव कसबा पोलिसांच्या मदतीने विनोद अशोकराव इंगळे रा.तेलिपुरा करजगाव ,२)अब्दूल हुसेन शौकत हुसेन रा.तेलिपुरा ,३)सदडू उर्फ साजिद रा.बोदड रोड करजगाव यांच्या घरी छापे टाकले असता त्याच्या ताब्यातून रुपये ७,२१,२९५ रुपये १,१४,६७0 रुपये २६,५८८ असा एकुण ८,६२,५५३ शासन प्रतिबंध असलेला गुटखा जप्त करण्यात आला.या कारवाईतील तिनही आरोपी फरार असून, पुढील कार्यवाही शिरजगाव कसबा पोलिस करीत आहे.फरार आरोपीचा शोध शिरजगाव कसबा पोलीस घेत आहे.त्याचप्रमाणे दिनांक १८ ऑक्टोबर २0२0 ला शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील, रिद्धपुर या गावातील अ.फाईम ब कादर रा.हलवाईपुरा याच्या घरी गोपनीय माहिती च्या आधारे रेड केली असता त्याच्या ताब्यातून १,४७,0७0 गुटखा जप्त करण्यात आला.त्याच गावातील राजू नारायण चरपे रा.बजरंग चौक रिद्धपुर याच्यावर रेड केली असता त्याच्या गोडावून मधून ऑटोमध्ये १,७0,७९0 रुपयाचा शासन प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.तर हलवाईपुरा येथील मो.सोहेल मो.कादिर याच्या किराणा दुकान मधून ३७८0 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. 

या कार्यवाही मुळे अनेक अवैध गुटखा व्यवसाय करणारे याचे धावे दणाणले आहे. ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ हरी बालाजी एन याच्या मार्गदर्शनखाली प्रो.(भापोसे)निकेतन कदम यांच्या नेतृत्वामध्ये ,सहायक पोलीस निरीक्षक वर्षा खर्चन,पो.कॉ अजय युवनाते,शैलेंद्र वानखडे,यांनी केली.या कार्यवाही मध्ये त्यांना स्थानिक पोलीस स्टेशन चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी देखील सहकार्य केले.