अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल करण्यासाठी काढली म्हशीवरून मिरवणूक

October 20,2020

पाटना : २० ऑक्टोबर - निवडणुकीच्या काळात प्रसिद्धीसाठी उमेदवार अनेक फंडे वापरतात. कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. यात एका अपक्ष उमेदवाराने जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी म्हशीवरूनच मिरवणूक काढली.

दरभंगा जिल्ह्यातल्या बहादुरपूर विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून नचरी मंडल यांनी अर्ज भरला.  हा अर्ज भरण्यासाठी ते चक्क म्हशीवर बसून आले. सोबत मोजके समर्थक आणि या उमेदवाराची म्हशीवरची स्वारी असा प्रकार पाहून लोकही आश्चर्य चकित झालेत.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.