१० लाखाची घरफोडी

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णव देवी चौकार राहणारे जौहर कुटुंब पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १०  लाख ३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

अमरजितसिंग अजितसिंग जौहर आपल्या कुटुंबासह वाढदिवस साजरा करण्याकरिता पेंच व्याघ्र प्रकल्पात काल संध्याकाळी गेले असता. अज्ञात चोरट्याने बेडरूमच्या स्लायडींगचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोने-चांदीचे दागिने रॅडो कंपनीचे घड्याळ ५ लाख रुपये रोख असा १० लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.