मास्क न लावणा-या २५४ नागरिकांकडून दंड वसूली

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर -  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२० ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २७ हजार रुपयांचा  दंड  वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३४९१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ५१,०४,५००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४९, धरमपेठ झोन अंतर्गत ६०, हनुमाननगर झोन अंतर्गत २६, धंतोली झोन अंतर्गत १५, नेहरुनगर झोन अंतर्गत १३, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत ११, आशीनगर झोन अंतर्गत १४, मंगळवारी झोन अंतर्गत ३५ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ८०२१ बेजबाबदार नागरिकांकडून रु ४० लक्ष १० हजार ५००  वसूल करण्यात आले आहे.