महापालकीकेतर्फे महिला पत्रकाराचा सत्कार

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - सविता हरकरे यांनी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली त्या काळात पत्रकारितेतील महिलांचा वावर फार कमी होता. विपरीत परिस्थितीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्र आवड म्हणून निवडले आणि त्यातच करियर केले. आज त्यांचे या क्षेत्रातील योगदान हे नव्या पिढीतील महिला पत्रकारांसाठी आदर्श आहे, असे उद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी काढले.

 महापौर संदीप जोशी यांनी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ हा उपक्रम सुरू केला. नवरात्रीतील नऊही दिवस विविध क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने गाजविणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्याचे त्यांनी ठरविले. मंगळवारी (ता. २०) चौथ्या दिवशी त्यांनी पत्रकार ते उपवृत्तसंपादक असा प्रवास करणाऱ्या सविता देव हरकरे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे होत्या. मनपाचा मानाचा दुपट्टा, साडी-चोळी, तुळशीचे रोप आणि मानपत्र देऊन महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचा गौरव केला.