अमरावती विद्यापीठात आता महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा

October 24,2020

अमरावती, 24 ऑक्टोबर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन-ऑफलाईन व असाईनमेंट अशा पद्धतीने घेण्याचा निर्णय झालेल्या विद्या परिषदेमध्ये एकमाते घेण्यात आला.

कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची विद्या परिषदेची सबा आभासी पद्धतीने झाली. या सभेमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा आभासी पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने संबंधित महाविद्यालयांना घ्यावयाची आहे. एम.सी. क्यू पद्धतीने पेपर सुद्धा संबंधित महाविद्यालयांना सेट करावयाचे असून 40 प्रश्‍नांचा पेपर असेल. त्यापैकी 20 प्रश्‍न विद्यार्थ्याला सोडवावे लागतील. परीक्षा एक तासाची राहणार असून परीक्षेचे वेळापत्रकही महाविद्यालय स्तरावर तयार होणार असून उन्हाळी 2020 च्या सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा 2 नोव्हेंबरपर्यंत घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयाला विद्यार्थीचे गुण विद्यापीठाला 5 ते 6 नोव्हेंबरपर्यंत पाठवायचे असून 8 नोव्हेंबरपासून परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून जाहीर होतील. 20 ऑक्टोबर रोजी आभासी पद्धतीने ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या रद्द करकण्याचा निर्णय सुद्धा आजच्या सभेत घेण्यात आला आहे. अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या अनुश्ेषाच्या परीक्षा असाईनमेन्ट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनीं संबंधित परीक्षेतील विषयाचे असाईनमेन्ट पूर्ण करून आपल्या महाविद्यालयाला विहित मुदतीत सादर करावयाचे असून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या असाईनमेन्टचे मूल्यांकन करून त्याचे गुण जास्तीजास्त 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाला पाठवावयाचे आहेत. शासनाचे निर्देश आणि गुमवत्ता ठेवून परीक्षा घेण्यात येणार आहे.