पत्नीचा खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप

October 24,2020


गडचिरोली, 24 ऑक्टोबर : पत्नीच्या डोक्याजवळ चाकूने वार करून तिचा खून करणार्‍या आरोपी पतीस जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश -3 बीयएम. पाटील यांनी काल सुनावले. लालू विज्या कोवासी असे् आरोपीचे नाव आहे.

16 जुलै 2019 रोजी आरोपी कोवासी याने मुलगा विनोद कोवासी हा शेतात काम करण्यासाठी गेला असता पत्नीसोबत  भांडण करून तिच्या डोक्याजवळ चाकूने वार केले. सदर प्रकार आरोपीच्या नातीने शपाहून शेतात काय करीत असलेल्या वडिलाकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. लागलीच मुलगा विनोद घरी आला असता त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. वडील आरोपी लालू कोवासी हा नेहमी आईसोबत भांडण करतो व तिला जीवानिशी ठार केल्याची तक्रार विनोद याने भामरागड पोलिस ठाण्यात दिली.

गुन्ह्याचा तपास ताडगाव पोलिस मदत केेंदाचे पोलिस उपनिरीक्षक समीर दाभाडे यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.