धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा

October 25,2020

नागपूर : २५ ऑक्टोबर - दरवर्षी प्रमाणे यावर्षी परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने  दीक्षाभूमी  येथे 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरे करण्यात आले. 

14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीला  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी 9 वाजता पुज्य महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून त्रिशरण व पंचशिल ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली.

त्या प्रसंगाची स्मृती म्हणून यावर्षी देखील अशोक विजयादशमी 25 ऑक्टोबर रोजी  सकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला माल्यार्पन प.पु. डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष  भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या करण्यात आले.

 तसेच सामुहिक बुद्धवंदना घेवून भिक्शुसंघातर्फे बुद्ध गाथेचे पठन  करण्यात आले . या प्रसंगी  सचिव डॉ . सुधीर फुलझेले ,  ना . रा . सुटे , , अॅड . आनंद फुलझेले,  विलास गजघाटे , डॉ .  बी . ए . मेहेरे उपस्थित होते.

 यावेळी समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली .