दरोडेखोरांनी केला बाप-लेकावर हल्ला

November 21,2020

दरोडेखोरांनी शस्त्रांसह घरात शिरकाव प्रवेश केला. मात्र वडिलांना जाग येताच दरोडेखोरांनी प्रथम त्यांच्यावर हल्ला चढविला. आवाज ऐकून मुलगाही पोहोचला. दरोडेखोरांनी सपासप वार करीत त्यालाही जखमी केले. अशा स्थितीत दोघांनी प्रतिकार करीत आरडाओरड केली. अखेर दरोडेखोरांनीच शस्त्र टाकून पळ काढला. ही घटना नागपूरच्या बेलतरोडी हद्दीतील साकेतनगरात घडली.

रमण गिरडकर असे जखमीचे नाव आहे. या घटनेता त्यांचा मोठा मुलगा विपुल गंभीर जखमी झाला आहे. रमण हे दूरसंचार कंपनीच्या कारखाना विभागातून मुख्य क्षेत्रीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. ते पत्नी, दोन मुले, सुन व नातीणसह राहतात. तळमजल्यावर जीम असून कुटुंबिय वरच्या मजल्यावर राहते. एरवी कंपाऊंडच्या गेटसह तळमजल्यावरील गेटलाही कुलूप लावले जाते. पण त्या दिवशी पाऊस आल्याने कुलूप लावण्याकडे दुर्लक्ष झाले. ही दरोडेखोरांसाठी आपत्ती संधी ठरली. रात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडून आला. रमण यांना जाग येताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार केला. रमण यांनी दरोडेखोराकडील चाकू हातात पकडून ठेवला व आरडाओरड केली. आवाज ऐकून त्यांचा मोठा मुलगा विपुल धावत आला. धटापटीत दरोडेखोरांनी विपुलचे डोके, छाती, कंबरेवर वार करून गंभीर जखमी केले. बापलेकासह कुटुंबीय मदतीसाठी आरडाओरड करीत असल्याने दरोडेखोर घाबरून पळून गेले. सोबत आणलेले शस्त्रही त्यांनी घरासमोरच फेकून दिले. पुढील तपास सुरु आहे.