खोट्या नावाने ई-मेल करून घातला 4 लाख 80 हजाराचा गंडा

November 21,2020

ग्रोवर इन्फोटेक प्रा.लि. च्या बॉसच्या ई-मेलवरून फेक व्यक्तीने स्वतःला नरेश ग्रोवर असल्याचे कंपनीतील अकाऊटंट महिलेला भासविले आणि 4 लाख 80 हजार रुपयांची आवश्यकता असल्याचा मेल करून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर पोलिसांनी विशाल ठाकूर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरच्या जयताळा येथील भांडे ले-आऊट येथे राहणार्‍या संध्या सूर्यवंशी या चिटणीस ले-आऊटच्या बैरामजी टाऊन येथे असलेल्या ग्रोवर इन्पोटेक प्रा. लि. येथे अकाऊंटट पदावर कार्यरत आहेत. 15 नोव्हेंबर 2020 रोजी विशाल ठाकूर नावाच्या व्यक्तीने त्यांचा बॉस नरेस ग्रोवर हेच ई-मेल करीत असल्याचे भासविले आणि मी मीटिंगमध्ये आहे. मला कॉल करू नका व मला 4 लाख 80 हजार रुपयांची आवश्यकता आहे, असे सांगितले.

बॉसला पैशाची गरज असल्यामुळे संध्या सूर्यवंशी यांनी त्यांच्या आयसीआयसीआय बँक, ब्र्रँच न्यू दिल्ली येथील खात्यातून 4 लाख 80 हजार रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले. त्यानंतर विशाल ठाकरूने स्वतःच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम तत्काळ काढून घेतली आणि नरेश ग्रोवर यांची 4 लाख 80 हजार रुपयांनी फसवणऊक केली. दरम्यान नरेश हे ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. विशाल ठाकूर नावाच्या खोट्या व्यक्तीने ग्रोवर यांच्या ई-मेल आयडीचा वापर करून फसवणूक केली. याप्रकरणी संध्या सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून सदर पोलिसांना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.